अंकुश चौधरीचा बाँडपट जरब

नो एंट्री पुढे धोका आहे आणि दुनियादारीच्या भरघोस यशानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीचा आघाडीचा चॉकलेट हिरो अंकुश चौधरी जरब चित्रपटांत अ‍ॅक्शन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, गणेशा प्रॉडक्शन प्रा.लि. प्रस्तुत आणि सह्याद्रि मोशन पिक्चर्स निर्मित जरब हा एक परिपुर्ण अ‍ॅक्शन बाँडपट असून 6 सप्टेंबर पासुन संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

चित्रपटांत अंकुश चौधरी सोबत सई लोकूर, संजय खापरे, प्रिया गमरे, विद्याधर जोशी, डॉ.गिरीष ओक यांच्या भुमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश पांचाळ यांचे आहे तर किेदार ष आनंद यांचे संगीत लाभले आहे. चित्रपटांत एकूण चार गाणी असून त्यात एक आयटम नंबर आहे. निर्मितीमुल्यांत कोणतीही कसर न ठेवलेला हा मराठीतला बाँडपट ष जरब ष प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही.