नवी दिल्ली: इंडियन मुजाहिदीनचा मास्टारमाईड व कुख्यात दहशतवादी यासीन भटकळला शुक्रवारी दिल्लीत आणले जाणार आहे. देशभरात ५० स्फोट करणा-या इंडियन मुजाहिदीनच्या या दहशतवाद्याला बुधवारी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सध्या तो बिहार पोलिसांच्या ताब्यात असून शुक्रवारी भटकळला विशेष विमानाने दिल्लीत आणले जाणार आहे.
यासिन भटकळला बिहार-नेपाळ सीमेवर बुधवारी अटक करण्यात आले. त्यानंतर तो बिहार पोलिसांच्या ताब्यात आहे. यासीनसोबत बाटला हाऊस एन्काऊंटरमधील अतिरेकी असादुल्ला अख्तरही जाळ्यात अडकला आहे. देशभरातील अनेक बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यासीन भटकळ व असादुल्ला अख्तर जेरबंद झाल्याने सुरक्षा यंत्रणांना हे मोठं यश मिळाले आहे.
यासिनच्या अटकेने मुजाहिद्दीनचे देशातील नेटवर्क मोडून काढण्यास मोठी मदत होईल. सध्या तो बिहार पोलिसांच्या ताब्यात असून शुक्रवारी भटकळला विशेष विमानाने दिल्लीत आणले जाणार आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली जाणार आहे.