ठाण्यातील दहीहंडी कोटयवधीची

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून दहीहंडी आणि ठाणे यांचे अनोख नाते आहे. ठाण्यातील दहिहंड्या यंदा कोटींची उड्डाण घेणार आहेत. ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील संघर्ष आणि रघुनाथनगरमधील संकल्प मंडळातर्फे होणा-या दहीहंडी उत्सवाकडेच जास्तीत जास्त गोविंदा पथकांची पावले वळण्याची शक्यरता आहे.

सलामीसाठी सर्वाधिक रोख बक्षिसे जाहीर केलेल्या ठाण्यातील या मंडळांकडे पहिली हजेरी देण्याची गोविंदा पथकांची योजना आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या संकृतीकडून एक कोटी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद्र आव्हाडांच्या संघर्षकडूनही मोठ्या रक्कमेचे बक्षीस दिले जाणार आहे.

त्यामुळे रोख बक्षीस पटकावण्यासाठी या मंडळांकडे जास्तीत जास्त पथकांची गर्दी होण्याची शक्यमता आहे. त्यासमुळेच गुरूवारी होत असलेल्याी ठाण्याच्या पाचपाखाडी भागातील संघर्ष आणि रघुनाथनगरमधील संकल्प मंडळातर्फे होणा-या दहीहंडी उत्सवाकडेच जास्तीत जास्त गोविंदा पथकांची पावले वळणार आहेत.