टीम इंडियाला इंग्लंडने टाकले मागे

नवी दिल्ली- नुकत्याच झालेल्यात अशेस कसोटी मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडविल्यानंतर आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने(आयसीसी) कसोटी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये इंग्लंडने टीम इंडियाला मागे सारुन दुसरे स्थान मिळविले आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलिया संघाची क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत इंग्लंड संघाने ११६ गुणांसह दुसरे स्थान गाठले आहे. जर ऑस्ट्रेलिया संघाने ऍशेस कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळविला असता, तर इंग्लंड तिस-या स्थानावर कायम राहीली असती व टीम इंडियाचे दुसरे स्थानही कायम राहीले असते. परंतु सामना अनिर्णीत राखण्यास इंग्लंडला यश आल्यामुळे इंग्लंडने कसोटी क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.

दरम्याकन, ऍशेस कसोटी मालिकेत मालिकेत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडविल्यानंतर त्याचा परिणाम दक्षिण आफ्रिका संघाच्या अव्वल स्थानावर झाला नाही त्यांघचे ते स्था न कायम आहे. तर दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाची क्रमवारीत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.