कोलचेस्टर – ‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमनासाठी काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरणारा गौतम गंभीरने त्याच्या चाहत्यांना निराश केले आहे. त्याच्याकडून याठिकाणीपण निराशाजनक कामगिरी केली. इसेक्सकडून नॉर्दम्पटनशायरविरुद्ध खेळताना सलामीवीर गंभीर फक्त ३१ धावा करू शकला. भारतात ‘ऑफ सिझन’ असल्यामुळे फलंदाजीच्या टचमध्ये राहण्यासाठी गंभीरने काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरला आहे. प्रख्यात इसेक्स काऊंटीकडून खेळत आहे.
काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना नॉर्दम्पटनशायरच्या पहिल्या डावातील ५३१ धावांना उत्तर देताना इसेक्सने पहिल्या डावात ४५ षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या. तर गौतम गंभीरने ६७ चेंडूंत ३१ धावा केल्या आहेत. फलंदाजधार्जिण्या खेळपट्टीवर गौतम धावांबाबत ‘गंभीर’च राहिला.
यापूर्वी नॉर्दम्पटनशायरने कर्णधार स्टिफन पीटर्स (१०१) आणि डेव्हिड सेल्स (१३१) यांच्या शतकी खेळींच्या जोरावर ५३१ धावा केल्या आहेत. ‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमनासाठी काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरणारा गौतम गंभीर आगामी काळात तरी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.