प्रसिध्द चित्रपट निर्माते प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘सत्याग्रह’ हा त्यांचा मागील चित्रपट ‘राजनिती’चाच पुढील भाग असल्याचे एका प्रतिष्ठीत दैनिकाने म्हटले आहे. या दोन्ही चित्रपटांची कथा ही राजकारणावरच आधारीत आहे.

‘सत्याग्रह’ हा चित्रपट आजकालच्या राजकारणावर आधारीत असून यात राजकारणातील त्रुट्या, विश्वासघात, अहं आणि संघर्ष आदी गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तर ‘सत्याग्रह’चा सिक्वेलही निघणार असल्याचीही बातमी ऐकायला मिळत आहे.
बॉलिवूडमध्ये प्रकाश झा यांचे नाव राजकीय आणि सामाजिक राजकारणांवरील चित्रपटासाठी प्रसिध्द आहे. त्यांच्या चित्रपटातून दाखवला जाणारा राजकीय दृष्टीकोन हा आजच्या राजकारणावर आधारीत असतो. त्यामुळे ३० ऑगस्टला प्रदर्शित होणारा ‘सत्याग्रह’ बॉक्स ऑफिसवर कसे प्रदर्शन करेल हे पाहणे औत्सूक्याचे राहिल.
‘सत्याग्रह’ची निर्मिती प्रकाश झा आणि युटीव्ही मोशन पिक्चर्सने केलीआहे. या चित्रपटात कलाकारांमध्ये अनेक प्रसिध्द कलाकार असून यामध्ये अमिताभ बच्चन, अजय देवगण, करिना कपूर, अर्जून रामपाल, मनोज वाजपेयी, अमृता राव आणि विपिन शर्मा यांची मुख्य भूमिका आहे.
‘सत्याग्रह’ ३० ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.