धोनीने केली वर्षभरात १८० कोटींची कमाई

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने जून २०१२ ते जून २०१३ या वर्षभरात ३.१५ कोटी डॉलर म्हणजेच जवळपास १८० कोटींची कमाई केली. त्यामुळे तो फोर्ब्सच्या यादीत सगळ्यात जास्त कमावणारा खेळाडू म्हणून १६व्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत सचिन तेंडूलकर १२५ कोटींची कमाई करुन यादीत ३१ व्या स्थानावर आहे. धोनीच्या या कमाईत त्याचा पगार, बोनस, पुरस्कारातून मिळालेला पैसा आणि जाहिरातीतून झालेल्या कमाईचा समावेश आहे.

या यादीत भारताचा दुसरा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. सचिन १२५ कोटींची कमाई करुन यादीत ३१ व्या स्थानावर आहे. गोल्फ स्टार टायगर वुड्स हा ७.८ कोटी डॉलरची कमाई करुन फोर्ब्सच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. टेनिस स्टार रॉजर फेडरर ७.१ कोटी डॉलर कमवत दुसऱ्या स्थानी आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार फर्नाडो अलोंसो (१९), लुईस हेमिल्टन (२६), टेनिस स्टार नोव्होक जोकोव्हिच (२८), राफेल नदाल (३०) आणि सुसाट उसेन बोल्ट (४०) लाही धोनीने मागे टाकले आहे. गेल्याफ वर्षी धोनी फोर्ब्सच्या यादीत ३१व्या स्थानावर होता.

टेनिस स्टार मारिया शारापोव्हा महिला खेळांडूची यादीत २.९ कोटी डॉलर कमवून पहिल्या स्थानावर आहे. तर टेनिस स्टार सेरेना विल्यियम्स २ कोटी डॉलरसह दुस-या क्रमांकावर आहे. चीनची टेनिस स्टार ली नानं १.८ कोटी डॉलर कमवत यादीत तिसरा क्रमांक मिळवला आहे