हैदराबाद – तेलंगणातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार हणमंतराव यांच्यावर तिरुपती येथे तेलंगणविरोधी आंदोलकांनी हल्ला केला. त्यांच्या गाडीवर दगडङ्गेक केली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हणमंतराव पोलिसांच्या पहार्यात हल्ल्यातून सुखरूप बाहेर पडले. परंतु तेलंगणवादी नेत्यावर उर्वरित आंध्रात झालेल्या अशा प्रकारच्या या पहिल्याच हल्ल्यामुळे दोन्ही भागातील तणाव वाढला आहे. दरम्यान, तेलंगण राष्ट्र समितीच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून उर्वरित आंध्रातल्या म्हणजे सीमांध्रा भागातील तेलंगण विरोधकांनी अशा प्रकारच्या हिंसक घटना टाळाव्यात असे आवाहन केले आहे.
कॉंग्रेसचे खासदार हणमंतराव हे काल तिरुपती-बालाजीच्या दर्शनासाठी तिरुपतीला गेले होते. तिरुपती हा जिल्हा सीमांध्रा भागातील आहे आणि या भागातील लोकांचा तेलंगणच्या निर्मितीला प्रखर विरोध आहे. त्यामुळे या लोकांना हणमंतराव हे तिरुपतीत येत आहेत हे समजले आणि त्यांनी हणमंतराव यांच्या गाडीसमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला. हणमंतराव बालाजीचे दर्शन घेऊन परतत असताना निदर्शकांनी त्यांची गाडी अडवली आणि सामाईक आंध्र जिंदाबाद अशा घोषणा द्यायला सुरुवात केली.
काही निदर्शकांनी हणमंतराव यांच्या गाडीवर दगड ङ्गेकले. त्यात त्यांच्या गाडीच्या काचा ङ्गुटल्या. मात्र ताबडतोब पोलीस धावून आले आणि त्यांनी खासदारांना हिंसक जमावातून बाहेर काढले. सीमांध्र भागामध्ये तेलंगणाची निर्मिती करण्याची घोषणा झाल्यापासून निषेध सभा, बंद, मोर्चे आणि निदर्शने यांना ऊत आला आहे आणि त्यामुळे तणाव वाढत चालला आहे. त्याचाच परिणाम होऊन हणमंतराव यांच्यावर हल्ला करण्याचा प्रकार घडला. या घटनेनंतर राव यांनी निदर्शनांचा निषेध केला आणि सीमांध्रातील जनतेने अशा प्रकारच्या आंदोलनापासून दूर रहावे, असे आवाहन केले.