सीमाभागात पाककडून गोळीबार सुरूच

श्रीनगर: पाकिस्तानकडून भारत-पाक सीमेवर अजूनही गोळीबार सुरूच आहे. शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणावर भारतातील पोलिस छावण्यां वर गोळीबार करण्याबत आला. भारत-पाक सीमेवरील पूँछच्या बीजी सेक्टरवर अंधाराचा फायदा घेत पाककडून फायरिंग करण्याबत आले. हे करीत असताना पाकिस्ताने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काही दिवसांपूर्वी पूँछमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात ६ भारतीय जवान शहीद झाले होते.

दरम्यान, पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या फायरिंगला भारतीय सैन्यांनीही चोख प्रतिउत्तर दिले. तर दुसरीकडे काश्मिरच्या हंदवाडा परिसरात अतिरेकी लपले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अतिरेक्यांना शोधण्याचे काम भारतीय जवान करत आहेत.

पाकिस्तानकडून शुक्रवारी कारगिल युद्धानंतर तब्बल १४ वर्षांनी, पुन्हा कारगिल परिसरात घुसखोरी केली आहे. पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन द्रास आणि काक्सार क्षेत्रात गोळीबार केला होता. तर स्वातंत्र्य दिनावेळीही पाकिस्तानकडून पुन्हा पूँछ सेक्टरमधील कृष्णाघाटी परिसरात गोळीबार झाला होता.