साहित्य संमेलन 3 ते 5 जानेवारी दरम्यान

पुणे, – सासवड येथे होणारे नियोजीत 87 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढील वर्षी जानेवारी महिन्यात 3 ते 5 जानेवारी दरम्यान होणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संमेलनाचे निमंत्रक तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिल महाजन, उषा तांबे, शुभदा मडणीस आदे उपस्थित होते. साहित्य संमेलन मार्ग्दर्शक समितीची शुक्रवारी बैठक झाली त्यानंतर शनिवारी संमेलनाच्या तारखा जाहिर करण्यात आल्या. साहित्य संमेलन 3 ते 5 जानेवारी दरम्यान होणार आहे. संमेलनाचा मुख्य मंडप पालखी तळ येथे असेल तर उर्वरीत कार्यक्रमांसाठी अचार्य अत्रे संस्कृतीक सभागृह, नगरपालिका सभागृह आणि दौलत चित्र मंदिर या ठिकाणांचा वापर करण्यात येणार आहे. संमेलनाचा उद्घाटन सोहळा 3 जानेवारी 4 ते 7 यावेळेत होणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगीतले.

साहित्य संमेलनात पाच परिसंवाद, दोन कविसंमेलने होणार आहेत. परिसंवादामध्ये प्रश्‍न आजचे उत्तरे संताची, मराठीच्या अस्तित्वाचे प्रश्‍न आणि मराठी बोली, माध्यमांतर, छंदोबद्ध मराठी कविता हरवत चालली आहे का? आणि राजकिय घडामोडी व मराठी साहित्य या विषयांचा समावेश आहे. याबरोबरच बाल आनंद मेळावा, कथाकथन, अभिजात कथेचे वाचन, दोन सांस्कृतीक कार्यक्रम आणि झेंदुची मुले ह खास अत्रे यांच्या साहित्यावर प्रकाश टाकणारा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. या शिवाय दोन मुलाखती, एक प्रकाशक व एक लेखक यांचा सत्कार आणि ज्येष्ठ साहित्यीकांच्या ध्वनिचित्रमितीचे सादरीकरण होणार आहे.

ग्रंथदिंडी ऐवजी ग्रंथघोष
साहित्य संमेलन म्हटल की ग्रंथ दिंडी आलीच. पालखीत ज्ञानेश्‍वरी ठेवावी की, राज्यघटना किंवा चिपळूणच्या सहित्य संमेलनाच्यावेळी हमीद हलवाई यांच्या घरापासून ग्रंथ दिंदी काढायची की नाही यावरून बरेच राजकारण झाले. सासवड येथील नियोजीत साहित्य संमेलनात मात्र ग्रंथदिंडी वरून वाद उद्भवणार नाही कारण ठिकाणी पालखी असेल, ग्रंथ पुजन असेल त्यानंतर दिंडी ऐवजी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी ग्रंथघोष करणार आहेत. ग्रंथघोषाम्ध्ये हे विद्यार्थी संताची वचणे, राष्ट्रभक्तीपर वचने यांचे सादरीकरण करतील असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.