पुणे,: जगात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ म्हणून जो दर्जा असतो, याची एक यादी नुकतीच हॉवर्ड विद्यापीठाच्या ‘एज्युकेशन नेक्स्ट’ या कार्यक्रमाच्या संशोधकांनी प्रसिद्ध केली आहे. त्यात जेथे दहा लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यात पुण्याचा क्रमांक पहिल्या शंभर शहरात तर नाहीच पण त्यात भारताचाही क्रमांक नाही. या विद्यापीठाच्या या यादीचा विषय आज ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे पुण्यातील अनेक शिक्षणसंस्था आपल्या संस्थेचा उल्लेख ‘पूर्वेकडील ऑक्सफोर्ड’ असा करत असतात. त्यात किती तथ्य आहे हे यातून तर स्पष्ट झालेच पण एका बाजूला पुण्यातूनच काही शिक्षण संस्था आपली विद्यापीठे अन्य राज्यात काढण्यास तयार झाली असताना येथे आहे तो दर्जा राहील की नाही, ही एक नवी समस्या पुढे उभी ठाकली आहे. स्थित्य’तरे व स्थलांतरे हे शब्द लिहायला जेवढे सोपे आहेत तेवढे पचवायला कठीण आहेत. सध्या जगालाच या स्थलांतर व स्थित्य’तर ङ्मा शब्दांचे वेड लागले आहे. महासत्तांची स्थित्यंतरे ज्याप्रमाणे जगाला हादरे देत असतात, त्याचप्रमाणे महासंस्थांची स्थित्त्यंतरेही त्या त्या जगाला हादरे देत असतात.
पुण्यातील दोन क्षेत्रातील विश्वांना नुकतेच मोठे हादरे बसले आहेत. त्या दोन्हीही हादरे मोठे असूनही त्याचा लगेचच काहीही परिणाम होणार नाही आहे. तरीही त्या अदृश्य हादर्याची धगही मोठी आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील डेट्राईट पूर्णपणे भंगारात निघणे हा पुण्यातील वाहननिर्मिती विश्वालाही बसलेला मोठा हादरा होता कारण स्वत:च एक महासत्ता असणार्या जनरल मोटर्स व वोक्स वॅगन वगैरे कंपन्या डेट्राईटचे दिवाळे काढून आल्या होत्या. डेट्राईटपेक्षा पुण्यात लेबर स्वस्त आणि चांगलेही असे वाटल्यावरून त्या कंपन्या तिकडून इकडे आल्या पण स्वस्त लेबर या कसोटीवर जगभर हिंडणार्या या कंपन्या येथून मुक्काम हालवताना तेथील दिवाळे काढून जातात हे जर वेळीच लक्षात आले नाही तर येथील तरुणांची मोठी पंचाईत होण्याची शक्यता आहे. याची चुणूकच सध्या दिसू लागली आहे कारण गेल्या सहा महिन्यापासून वाहननिर्मितीक्षेत्रात प्रचंड मंदी आली आहे व त्यामुळे मर्सिडीज, जनरल मोटार्स, व्होक्स वॅगन या कंपन्यांनी आपली उत्पादने निम्म्यांनी कमी केली आहेत त्याचा परिणाम त्या कंपन्यांना सुटे भाग पुरवणार्या कंपन्यावर झाला आहे तेथे निम्मे कामगार बेकार झाले आहेत.
पुण्याचे वैभव असलेल्या शिक्षण क्षेत्रातही वाहन उद्योगातील स्थिती आहे तीच स्थिती शिक्षणक्षेत्रात येईल की काय असे वाटू लागले आहे. बदल हा नेहेमी प्रगतीला कारण ठरत असतो, हे शिक्षणक्षेत्रातील कायमस्वरुपी सुभाषित आहे. पण एखाद्या घटनेमागे जेंव्हा एकापेक्षा अधिक कारणे दिसू लागतात तेंव्हा त्याची गंभीर दखल घ्यावी लागते. पुण्यातील किंवा भारतातील कोणतीही शिक्षणसंस्था जरी जागतिक दर्जाची नसली तरी गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात उडी घेतल्याने व पहिल्याच टप्प्यात त्यांनी या बरेच अंतर कापले आहे. त्यामुळे पुण्यातील शिक्षणसंस्था या जागतिक स्पर्धेत नसल्या तरी गुजराथच्या किंवा नरेंद्र मोदी यांच्या स्पर्धेत आपोआपच उतरल्या आहेत.
पुण्यातील सिंबियोसिस व एमआयटी या शिक्षणसंस्थांना त्यांच्या सध्याच्या व्यापापेक्षा दुप्पट व्याप पसरण्यास लागेल, अशी जागा, भांडवल व प्रशासनाचे सहकार्य लागते ते सहकार्य मध्यप्रदेश सरकारने देवू केले आहे. पहिल्या टप्प्यात येथील सिंबियोसिस आणि एमआयटी यांनी तिकडे मोठमोठे प्रकल्प करायला घेतले आहेत. याचवेळी गुजराथने पुढील पाच वर्षात जागतिक दर्जाचे शिक्षण देवू शकणारे दोन लाख शिक्षण तयार करून विदेशी पाठवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करत आणला आहे व त्याच बरोबर गुजरातेत जागतिक दर्जाचा ‘एज्युकेशन हब’उभा करायला घेतला आहे. ज्यावेळी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एखादी गोष्ट करायची म्हणतात तेंव्हा ती होण्याची शक्यता मोठी असते. शिक्षण क्षेत्रातील वस्तुस्थिती अशी आहे. त्यामुळे जगात जे बदलाचे वारे वाहू लागले आहेत ते वाहननिर्मिती क्षेत्राबरोबरच शिक्षणक्षेत्रात येतात की काय असे वाटू लागले आहे.
जागतिक पातळीवरील शिक्षणाचा दर्जा म्हणजे काय याची हॉवर्ड विद्यापीठाने एक व्याख्या केली आहे. त्यात ज्यांना पुढील तीस वर्षाच्या जागतिक शिक्षणाचा वेध घेवून गतिमान अभ्यासक्रम देता येतो, त्यांचा त्यात प्रथम क्रमांक लागतो. सध्या याबाबत जी यादी प्रसिद्ध झाली आहे, त्यात फिन्लंड, कोरिया, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, ब्रिटन, न्यूझीलंड, स्वीत्झर्लंड, कॅनडा, आयर्लंड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया, पोलंड, जर्मनी, बेल्जियम, अमेरिका, हंगेरी, स्लोवाकिया, रशिया अशी क्रमवार यादी आहे. भारतातील आयआयटीज, अहमदाबादची आयआयएम किंवा दिल्लीतीलही कोणत्याही संस्थेचा यात क्रमांक नाही. भारतासारख्या सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचा क्रमांक सोडाच पण या देशातील एकही संस्था त्या यादीत बसणारी नाही, हे नवे सत्य समोर आले आहे.
यात भारताला आंतर्मुख करणारा एक घटक मात्र आहे, तो म्हणजे या पातळीची एकही शिक्षणसंस्था भारतात नाही पण त्या प्रत्येक विद्यापीठात व देशात भारतीय तरुणांनी चांगले यश मिळवले आहे. किंबहुना जगातील कोणत्याही चांगल्या विद्यापीठाची यादी भारतीय तरुणांच्या उपस्थितीखेरीज पूर्ण होत नाही,हेही स्पष्ट होवू लागले आहे. त्यामुळे या आघाडीवर निराश न होता वेगाने कामाला आरंभ करण्याची गरज आहे. या आघाडीवर पुण्यातील जाणकार मंडळींनी एकत्र येवून जर प्रयत्न सुरु केले तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. गेल्या दहा वर्षात जगात जावून शिक्षण क्षेत्राचा व संशोधन क्षेत्राचा प्रचंड अनुभव घेवून परत पुण्यात स्थिर झालेले अनेक विद्वान आहेत, त्यांच्या मदतीने पुन्हा जर कामाला आरंभ केला तर या क्षेत्रात नवा प्रकल्प उभा राहण्यास हरकत नाही.