डीझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली – अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता डीझेलच्या दरात प्रती लिटर 50 पैशांची वाढ होऊ शकते. पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोइलींच्या म्हणण्यानुसार तेल मार्केटिंग कंपन्या त्यांना हवे तर दर महिन्याला डीझेलच्या दरात 50 पैशांची वाढ करू शकतात. याच वर्षी सरकारने जानेवारी महिन्यात एचपीसीएल, बीपीसीएल, आणि इंडियन ऑयल या तेल कंपन्यांना दर वाढवण्याची परवानगी दिली होती. परंतु मंत्री वीरप्पा मोइली यांनी केरोसीन आणि एलपीजीच्या किमतीत वाढ होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.