चेन्नई- चेन्नईमध्ये एका अजब बाळाला पाहून डॉक्टरही चक्रावले आहेत. कारण, हे बाळ पाहता पाहता स्वत: पेट घेते. यामुळे या बाळाच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. आपल्या तीन महिन्यांच्या चिमुकल्याला घेऊन राहुलच्या आईने हॉस्पीटल गाठले. या बाळाला पाहून डॉक्टरांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला.
हे बाळ भाजलेल्या अवस्थेत हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु, ही कोणीही घडवून आणलेली परिस्थिती नव्हती तर हे बाळ स्वत:च पेट घेत असल्याचं तपासणीनंतर डॉक्टरांच्या लक्षात आलं. या बाळाला हॉस्पिटलमधील अर्भकांसाठी असणार्या खास आयसीयू’मध्ये ठेवण्यात आलंय.
अचानक गरज पडल्यास त्या मुलाच्या बाजूला आग विझवणारे शंकूसारखे एक यंत्र आणि एक पाण्याची बादली ठेवण्यात आली आहे. गंभीर भाजलेल्या अवस्थेत या तीन महिन्याच्या राहूलला किलपॉक मेडिकल कॉलेज हॉस्पीटल’मध्ये दाखल केले आहे. या मूलाला स्पॉन्टेनिअस हृयुमन कम्बस्टशन’ नावाचा अतिशय वेगळा
आणि विरळ वैद्यकीय व्याधीने पीडित असा हा आजार झालेला आहे.
या आजाराविषयी ऑनलाईन माहीती काढली असता 300 वर्षात जगभरातून फक्त 200 रूग्ण या आजाराने पीडित असल्याचं हॉस्पिटलचे बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. आर. नारायण बाबू यांनी सांगितलंय. 1995 साली लंडनमधील एका 73 वर्षाच्या वृध्दाबरोबरही अशीच घटना घडली होती. अचानक झोपेत पेट घेऊन त्या त्याचे निधन झालं होतं.
चयापचयनाने तयार होणारे ज्वालाग्रही वायू शरिरात तयार होऊन अचानक बाहेर पडतात आणि पेट घेतात, असे वैद्यकीय नियतकालिकांमध्ये आढळले आहे. डॉक्टरांच्या मते, पेट घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या मुलाला उन्हात जाऊ न देणे, ठराविक प्रकारची कपडे घालणे अशी अनेक पथ्ये पाळावी लागतील.
विल्लुपुरम जिल्ह्यातील नेदिमोलियूर गावातील राजेश्वंरी या शेतमजुराच्या पत्नीला हा मुलगा झाला तेव्हा त्या दाम्पत्यास अत्यानंद झाला होता. परंतु जन्मानंतर नवव्या दिवशी या मुलाने अचानक पेट घेतला तेव्हा तिची पाचावर धारण बसली. राजेश्वतरीने स्वत: मुलाला जाळले, असा आरोप लोकांनी केला. त्यानंतरच्या तीन महिन्यांत पुन्हा तीन वेळा असा मुलखावेगळा प्रकार घडला तेव्हा राजेश्व्रीच चेटूक करते, असे म्हणून गावाने तिला व तिच्या कुटुंबालाही वाळीत टाकले.
अखेर विल्लूपूरमच्या जिल्हाधिकार्यांननी भाजल्याच्या गंभीर जखमा झालेल्या राहुलला किलपॉक हॉस्पिटलमध्ये पाठविले. सध्या त्याच्या जखमांवर मलमपट्टी करण्यात येत आहे. या दाम्पत्याला दोन वर्षांची मुलगी असून तिच्यामध्ये असा कोणताही दोष नाही.