११०० राखीव पोलिसांचे अवयव दान

नवी दिल्ली – गेल्या मंगळवारी (६ ऑगस्ट) साजर्‍या झालेल्या जागतिक अवयव दान दिनाचे औचित्य साधून केंद्रीय राखीव पोलीस दलातील ११०० जवानांनी मृत्यूपरांत अवयव दान करण्याची घोषणा केली. तशी वचनपत्रे त्यांनी लिहून दिली. आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातल्या ज्या अवयवांचा वापर अन्य गरजू व्यक्तींसाठी होऊ शकतो त्याला आपले अवयव देण्यात यावेत अशा शपथपत्रावर ११८४ राखीव पोलिसांनी सह्या केल्या.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांमधील अवयव दान विषयक यंत्रणेद्वारे काल अवदान दान दिन साजरा करण्यात आला, तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उत्तर विभागाचे महानिरीक्षक ए.पी. माहेश्‍वरी यांनी या जवानांना अवयव दानाची शपथ दिली. भारतात या राखीव पोलीस दलाचे तीन लाख जवान असून ते प्रामुख्याने भारतातल्या नक्षलवादी आणि माओवाद्यांच्या विरोधात लढत असतात.

टाईम्स् ऑङ्ग इंडिया या इंग्रजी दैनिकाने अवयव दान मोहीम चालवली असून तिला अतीशय उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. टाईम्स् ऑङ्ग इंडियाकडे अवयव दानाची निवेदने पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार ५० हजार लोकांनी निवेदने पाठवली असून आपले अवयव मृत्यूनंतर काढून घेऊन गरजूंना द्यावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. ती व्यक्त करणार्‍यांमध्ये भारताच्या पूर्व-पश्‍चिम, दक्षिण-उत्तर अशा सर्व भागातील लोकांचा तसेच सर्व क्षेत्रातील आणि समाज गटातील अवयव दात्यांचा समावेश आहे.

माणूस मरतो तेव्हा त्याचे सगळेच अवयव निकामी होत नाहीत. त्याच्या शरीरातील हृदय, मूत्रपिंड, यकृत, ङ्गुफ्ङ्गुस आणि डोळे हे अवयव काही काळ कार्यरत राहतात. या काळात ते काढून घेतले तर त्याची गरज असणार्‍या एखाद्या रुग्णाला ते देता येतात आणि त्या रुग्णाचे प्राण वाचतात. ही काहीही न गमावता होणारी समाजसेवाच आहे. म्हणून सध्या जगभरामध्ये अवयव दानाची मोहीम सुरू आहे आणि ६ ऑगस्ट हा दिवस जागतिक अवयव दान दिन म्हणून साजरा केला जात आहे.