शेजारी राष्ट्र पाकिस्तानबद्दल रोचक माहिती

भारताची फाळणी होऊन जन्माला आलेले पाकिस्तान पूर्वी भारताचा भाग होते हे खरे पण आता ते स्वतंत्र राष्ट्र आहे. शेजारी राष्ट्र असूनही आपल्यापैकी बऱ्याच जणांना पाकिस्तान विषयी खूप माहिती नाही. त्याविषयी थोडे जाणून घेणे रोचक ठरेल.

फाळणीनंतर वेगळे झालेला पाकिस्तान स्फोट, दहशतवादांचा देश म्हणून प्रसिद्धीस आला आहे कारण येथे सतत काही ना काही दहशतवादी घटना घडत असतात. देशाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे जगात अतिरेक्यांचे निवासस्थान म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. या देशाचे दुसरे नाव रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असेही आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत पाकिस्तान जगात ६ नंबरचा देश आहे आणि त्यांचा गणतंत्र दिवस २३ मार्च रोजी साजरा होतो. यालाच पाकिस्तान दिवस म्हटले जाते. देशात आत्तापर्यंत दोन जणांना नोबल पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील एक आहे मलाला युसुफझाई आणि दुसरे आहेत अब्दुल सलाम. त्यांना फिजिक्स मध्ये नोबेल मिळाले आहे. जगातील सर्वात मोठे पोलो मैदान पाकिस्तान मधील गीलगिट येथे आहे तर सर्वात मोठी मिठाची खाण खेवडा माइन्स नावाने ओळखली जाते. उर्दू या देशाची राष्ट्रभाषा आहे तर व्यावहारिक भाषा इंग्रजी आहे. या देशात भारताप्रमाणेच ६० भाषा बोलल्या जातात. येथला राष्ट्रीय खेळ क्रिकेट आहे. मात्र जगात सर्वाधिक फुटबॉल पाकिस्तान येथे तयार होतात.

पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीला लॉलीवूड म्हटले जाते आणि येथे हिंदी, उर्दू, पंजाबी आणि पश्तू भाषेतील चित्रपट बनतात. काबुली चण्याचा पाकिस्तान सर्वात मोठा उत्पादक देश आहे. सर्वात मोठे अँब्युलंस नेटवर्क पाकिस्तान मध्ये असून पाकिस्तानची सिंचन व्यवस्था जगात सर्वोत्कृष्ट मानली जाते. सर्वात उंच पर्वत के २ पीओके मध्ये आहे. अण्वस्त्रे असलेला पाकिस्तान हा पहिला इस्लामिक देश आहे.