गुवाहाटी – आसाममध्ये एका दहशतवादी संघटनेच्या सदस्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सुमारे दोन किलो आरडीएक्स स्फोटके सापडली. स्वातंत्र्यदिनानिमित्त हाफलाँगमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांवेळी घातपात घडवण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात येणार होता.
आसाममध्ये आरडीएक्स जप्त; एका दहशतवाद्याला अटक
ही स्फोटके वेळीच जप्त करण्यात सुरक्षा दलांना यश आले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव जॉन गॅब्रियल असे आहे. पोलीस आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
