इस्लामाबाद – पाकिस्तानी सैनिकांकडून सोमवारी रात्री घुसखोरी करत भारतीय चौक्यांवर केलेल्या हल्ल्याचे पाकिस्तान सरकारने खंडन केले आहे. पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यांनी या घटनेचा इंकार करत पाकिस्तानी लष्करी जवानांनी भारतीय सिमेत घुसखोरी केलेली नाही आणि गोळीबार केलेला नाही. त्यामुळे भारतीय सरकारचे आरोप तथ्यहीन असल्याचे आज (मंगळवार) एका वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितले.
भारतीय चौक्यांवर हल्ला केलेलाच नाही – पाकिस्तान
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानेही भारताचे आरोप फेटाळले आहे. तर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे कसलेच उल्लंघन झालेले नसून आम्ही भारतासोबत लवकरच शांतता वार्ता सुरु करणार आहोत असेही परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्यांनी सांगितले आहे.
सोमवार रात्री जम्मू काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील पूँछ सेक्टरच्या चाकंदा बाग भागात असलेल्या भारतीय चौक्यांवर पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला होता. यावेळी पाकिस्तानच्या सैन्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच भारतीय सैनिक ठार झाले आहेत.
