
‘दुनियादारी’ हा मराठी सिनेमा काढून ‘चेन्नई एक्स्प्रेस’ सिनेमाचा शो लावला तर सिनेमागृह बंद पाडू अशी धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेनं मुंबईतल्या सिंगल स्क्रीन थिएटर्सचालकांना दिली आहे. मनसे उद्या यासाठी आंदोलन करणार आहे असं मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरांनी सागितले की. दिग्दर्शक रोहित शेट्टी दिग्दर्शित चेन्नई एक्सप्रेस हा सिनेमा येत्या आठ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. या सिनेमात शाहरूख खान, दिपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका आहे.
