मुंबई – मनसे आमदार प्रविण दरेकर आणि शिवसेना आमदार ओमराजे निंबाळकर यांचं निलंबन आज मागे घेण्यात आले. गेल्या आठवड्यात विधीमंडळात
मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द काढल्यानं, प्रवीण दरेकरांवर वर्षभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
आमदार दरेकर, ओमराजे यांचं निलंबन मागे
आज संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दरेकरांचं निलंबन मागे घेण्यासाठी प्रस्ताव मांडला. आणि अवघ्या चारच दिवसात दरेकरांवरची कारवाई मागे घेण्यात आली. अशाच प्रकारे चर्चे दरम्यान असंसदीय भाषेचा वापर केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार ओमराजे निंबाळकर यांचंही अर्थसंकल्पीय अधिवेशनात निलंबन करण्यात आलं होतं. तेही आज मागे घेण्यात आलं.
येत्या काळात असं वर्तन केल्यास गय केली जाणार नाही अशी ताकीदही देण्यात आली आहे.
