नवी दिल्ली – अभिनेता आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांचं कौतुक केलं आहे. नितिश कुमार पीएम मटेरियल आहेत, तसेच देशातील निवडक मुख्यमंत्र्यापैकी एक असल्याचंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे. तसेच खासगी संबंधं राजकारणात आणणार नसल्याचंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं आहे.
नितीशकुमार यांचे शत्रुघ्न सिन्हांकडून तोंडभरून कौतुक
मात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या वक्तव्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा हे काय बोलले, हे मी प्रत्यक्षात ऐकलेले नाही, त्यामुळे यावर घाईत काहीही बोलणे योग्य ठरणार नाही, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपकड़ून काय प्रतिक्रिया येते, यावर सर्वांची नजर आहे.
