
मुंबई – माजी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. युतीचे सरकार असताना चिक्की प्रकरण गाजले होते. पण आपल्यावरील बिनबुडाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी वारंवार सांगितले आहे. चिक्की प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडेंनी चिक्कीताई म्हणणाऱ्यांना दिले उत्तर
मी निर्णयात पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी पावले उचलली. शिक्षक भरती हा एकमेव विषय नाही. तुम्ही मला बघितले की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अत्यंत सुंदर काम आहे, असे अनेक निर्णय मी घेतले आहेत. यामध्ये पारदर्शक निर्णय आहेत. तितकाच हा पण निर्णय आहे. त्यामुळे असे विचार माझ्या डोक्यात येऊच शकत नाही. पण आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात असे विचार येऊ शकतात. त्यांना दोष देत नाही,
कारण त्यांची पर्सनालिटीच तशी आहे. त्यांना कुठेही पैसा दिसतो. कुठेही माफिया दिसतो. कुठेही भ्रष्टाचार दिसतो, ते आरोप करणारच. मी माझे म्हणणे स्पष्ट मांडले आहे. मी माझा निर्णय अगदी शुद्ध मनाने घेतला आहे. चिक्कीचा ब्रँड जर माझ्या नावाने वाढत असेल. ते खाऊन लोकांचे आयर्न वाढत असेल. मला हरकत नाही, असं पंकजा मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
