पोलिसांच्या गोळीबारात बाईक स्टंट करणारा युवक ठार

नवी दिल्ली: दिल्लीच्या संसदमार्गावर शनिवारी रात्री उशिरा बाईकर्सची स्टंटबाजी रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. या गोळीबारात 1 बाईकर ठार तर 1 जखमी झाला आहे.

श्रीमंत धनदांगड्यांची मुलं महागड्या टू व्हिलर गाड्यांवरून बाईक रेसिंगचा खेळ खेळतात. पोलिसांनी वारंवार कारवाई करून सुध्दा हे प्रकार थांबत नाही.या बाईक रेसिंगमुळे रात्री उशिरा प्रवास करणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो. तसेच या कार रेसिंगमुळे किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात झाले आहेत.

शनिवारी रात्री दिल्लीच्या संसद मार्ग रस्त्यांवर बाईकर्सची स्टंटबाजी सुरू होती. ही स्टंटबाजी रोखणार्‍या पोलिसांच्या व्हँनवर बाईकर्सनी दगडफेक केल्यानं पोलिसांनी प्रतिउत्तरादाखल गोळीबार केला. या घटनेत 1 बाईकर्सचा मृत्यू झाला आहे.