स्वतंत्र तेलंगणा राज्यांची लवकरच घोषणा?

नवी दिल्ली: स्वततंत्र तेलंगणा राज्याची गेल्या काही दिवसांपासून असलेली मागणी आता लवकरच मान्य होणार असे दिसत आहे. तेलंगणा हे स्वतंत्र राज्य करण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आंध्र प्रदेशचे तीन भाग होऊन तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या वाट्याला प्रत्येकी १२ जिल्हे मिळणार आहेत. तर हैदराबाद शहराला आता केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळणार असल्याचे समजते. याबाबतची औपाचारिक घोषणा लवकरच होणार असल्यापचे समजते.

पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिेदे याची घोषणा करु शकतात अशी शक्‍यता सुत्रांनी व्यरक्त केली. दिल्लीमध्ये शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. या बैठकीतच हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. पण काँग्रेस कार्यकारिणी आणि सर्वपक्षीय चर्चेनंतरच याची घोषणा केली जाईल.

त्याआधी काँग्रेसचे आंध्र प्रभारी दिग्विजय सिंह यांनी आंध्रप्रदेशच्या काँग्रेस नेत्यांशी तीन तास चर्चा केली. त्यांचे याबाबत मते त्यांनी आजमावून घेतली. त्यानंतरच स्वतंत्र तेलंगणाच्या मुद़दयावर एकमत झाले आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचा निणय आता लवकरच घेण्यात येणार असल्याचे समजते.