लोकसभेच्या जागावाटपावरून आघाडीत मतभेद

मुंबई: लोकसभेच्या निवडणूक आठ महिन्यांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे सध्या या जागावाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये् चर्चा सुरू आहे. मात्र या निवडणुकीसाठी जो फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद आहेत. लोकसभेसाठी यापूर्वी तयार करण्यात आलेला २२-२६ चा फॉर्म्युला कायम राहण्याची शक्यता असताना आघाडीत मात्र बिघाडी होण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘गेल्या वेळेसच्या निवडणूकनुसार २२-२६ चा फॉर्म्युला तयार झाला आहे.’ तर माणिकराव ठाकरे यांच्या‍ मते दोन्ही पक्षांमध्ये कोणत्याही फॉर्म्युल्यावर अजून तरी एकमत झालेले नाही, किंबहुना जागावाटपाची चर्चाही सुरु झालेली नाही.

वरील परस्परविरोधी विधानामुळे आघाडीत मतभेद असल्याचे निष्पान्न‍ झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या‍ म्हचणण्याीनुसार काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी २२ जागांवर लढणार असून या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचा दावाही आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे माणिकरावांच्या बोलण्यात तथ्य आहे की आव्हाडांच्या हे मात्र गुलदस्त्यात आहे. एक मात्र नक्कीा आहे की, दोन्हीू पक्षाचे अजून काय ते ठरलेले दिसत नाही. त्या.मुळे हे मतभेद आहेत.