संजय दत्तचा शेवटचा प्रयत्न फोल

नवी दिल्ली – १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी चित्रपट अभिनेता संजय दत्त याने आपली शिक्षा कमी होण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली दुसरी ङ्गेरविचार याचिका न्यायालयाने ङ्गेटाळून लावली. त्यामुळे न्यायालयीन तरतुदींचा शक्यतो जास्तीत जास्त वापर करून सवलती मिळविण्याचा त्याचा प्रयत्न आता ङ्गसला आहे आणि आपल्याला शिक्षेत सवलत मिळेल ही आशा फोल ठरली आहे.

मुंबई बॉम्बस्फोटाच्यावेळी त्यात गुंतलेल्या देशद्रोही दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून बेकायदा शस्त्र बाळगल्याबद्दल संजय दत्त याला पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली गेली आहे. उच्च न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती, परंतु त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अपील केले आणि दरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मिळवली. त्यामुळे तो बाहेर राहिला. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याचे अपील फेटाळल्यामुळे त्याला १६ मे रोजी तुरुंगात जावेच लागले.

आपले काही चित्रपट अर्धवट आहेत, आपल्याला आता पश्‍चात्ताप झालेला आहे अशी काही कारणे सांगून शिक्षेतून माफि मिळते का, हे बघण्याचा त्याचा प्रयत्न होता. त्यासाठी त्याने फेरविचाराची दुसरी याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने ती दाखल करून घेतली, परंतु तिचा निकाल लागेपर्यंत त्याला तुरुंगात रहावे लागेल असे बजावले. त्यामुळे तो सध्या तुरुंगात आहे आणि ही दुसरी याचिकाही ङ्गेटाळल्यामुळे त्याचा पाच वर्षांचा तुरुंगवास आता टळणार नाही हे उघड झाले आहे. संजय दत्त याने त्याच्यावर खटला भरल्यापासून १९ महिने तुरुंगवास भोगलेला होता. त्यामुळे त्याला साडेतीन वर्षे आत रहावे लागणार आहे आणि त्यातलेही दोन महिने आता संपलेले आहेत. म्हणजे आता त्याला ३९ महिने आत रहावे लागणार हे निश्‍चित आहे.