डायरेक्टर रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल-३ या कॉमेडी सिनेमाचा तेलुगू रिमेक लवकरच येत आहे. त्या सिनेमातून बॉलीवुडची एके काळची ‘तू चीज बडी मस्त मस्त’ गर्ल रवीना टंडन ब-याच वर्षनंतर एन्ट्री करणार आहे. यापूर्वी देखील अभिनेत्री रवीनाने तेलुगू सिनेमात काम केले आहे.
यापूर्वी १९९३ मध्येर रवीनाने बंगार बुलोडुज या तेलगु सिनेमात काम केले होते. त्याशिवाय तिने २००१ साली आकाशा विधीलोज तेलगु सिनेमात काम केले होते. रवीनाने १२ वर्षानंतर तेलुगु सिनेमात काम केले होते. त्यामूळे पुन्हा एकदा तिने तेलगु सिनेमातून एन्ट्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
तेलुगू सिनेमाचे फिल्मकार श्रीनिवासने ‘गोलमाल-३’ चे रिमेक करीत आहेत. यासाठी त्यानी रवीना टंडनची निवड केली आहे. या सिनेमात रवीनाच्या अपोजिट मोहन बाबू काम करणार आहे. यामध्ये रवीना आणि मोहनबाबू शिवाय हंसिका मोटवानी आणि तनिश यांची मुख्य भूमिका आहे. आगामी महिन्यात या सिनेमाचे शुट सुरू होणार असून पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचे समजते.