नवी दिल्ली दि.१८ – भाजपचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख व गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सभांमधून र्कांग्रेसवर टीकेची झोड उठवित असले तरी त्यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या नेत्यांनी संयम बाळगावा आणि अतिशय सावध राहवे असे आदेश काँग्रेस हायकमांडने आपल्या नेत्यांना दिले असल्याचे समजते. मोदींच्या धर्मनिरपेक्षतेबाबतच्या टीकेला उत्तर देऊच नका असेही स्पष्ट आदेश या नेत्यांना दिले गेले असल्याचे अंतर्गत वर्तुळातून खात्रीलायक सूत्रांकडून सांगितले जात आहे. कारण मोदींना प्रत्युत्यर देण्याचा प्रकार काँग्रेसवरच बुमरँग प्रमाणे आदळेल अशी भीती हायकमांडला वाटते आहे.
मोदींना प्रत्युत्यर देण्याच्या नादात केलेली विधाने काँग्रेसला अधिकच धोकादायक ठरू शकतील असे हायकमांडचे म्हणणे आहे. कारण मोदींच्या पक्षातील कोणीही त्यांच्या समर्थनार्थ बोलत नाही व अशावेळी काँग्रेसकडूनच प्रत्युतरे दिली गेली काँग्रेसच्या लाईन ऑफ अॅटॅकला मोदी एकटेच तोंड देत असल्याचा संदेश समाजात जाईल आणि हे काँग्रेससाठी बुमरँग ठरेल असे मतही व्यक्त केले जात आहे.
काँग्रेस हायकमांडला दिल्या गेलेल्या सल्ल्याप्रमाणे गोध्रा दंगल व मोदींची मुस्लीमविरोधी भूमिका यामुळे मोदी हिदुत्वाचा आयकॉन म्हणून निर्माण झालेली त्यांची ओळख जनतेने स्विकारली आहे. त्यामुळे मोदींनी या विषयावर कोणतेही भाष्य केले तरी त्याला काँग्रेस नेत्यांनी प्रत्युत्यर न देता त्याऐवजी विकास आणि स्थानिक मुद्द्यावर अधिक भर द्यावा.
गेल्या गुजराथ विधानसभा निवडुकांत काँग्रेसने ही पॉलिसी राबवून गुजराथेतील विकास आणि स्थानिक मुद्दे यावरच प्रचारात अधिक भर दिला होता तसेच २००२ साली झालेल्या दंगलींचा उत्लेखही टाळला होता. मोदींना हिंदूंचा पाठिबा नेहमीच राहणार हे गृहित धरून मतांचे ध्रुवीकरण टाळायचे असेल तर मोदींच्या धर्मनिरपेक्षतेच्या टिकेला उत्तर दिले जाऊ नये असाही सल्ला काँग्रेस हायकमांडला दिला गेला असल्याचे समजते
मोदींनी पुण्यातील सभेत बोलताना देशापुढील अडचणींवर प्रश्न आले की काँग्रेस धर्मनिरपेक्षतेचा बुरखा ओढते अशी टीका करताच काँग्रसेच्या किमान सहा वरीष्ठ नेत्यांनी मोदीच कसे धर्मांध आहेत यबाबत वकतव्ये केली होती. त्यावरून नेत्यांना हे आदेश दिले गेले आहेत असे सांगण्यात येत आहे.