पाकिस्तानची विंडीजवर मात

गयाना – अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या कामगिरीमुळे पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर १२६ धावांनी दणदणीत विजय मिळविला. पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली आहे.

काही दिवसांपुर्वी झालेल्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेत राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलेल्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्याप कामगिरीच्या जोरावर पाच वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर १२६ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

या सामान्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार ड्वेन ब्राव्हो याने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला २२४ धावांवर रोखले. परंतु विजयासाठी २२५ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या वेस्ट इंडिजला ४१ षटकांत फक्त ९८ धावाच करता आल्या. प्रथम क्षेत्ररक्षण करताना वेस्ट इंडिजने जेसन होल्डरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानची अवस्था ५ बाद ४७ अशी करून टाकली होती. परंतु त्यानंतर कर्णधार मिसबाह-उल-हक (५२) व त्याच्या मर्जीत नसलेल्या शाहिद आफ्रिदी (७६) या जोडीने सहाव्या गड्यासाठी १२० धावांची भागीदारी रचली. पाकिस्तानचा संघ निर्धारित ५० षटकांत ९ बाद २२४ धावा करू शकला.

मोहम्मद इरफानने जॉन्सन चार्ल्स (०) डॅरेन ब्राव्हो (५) यांना बाद करून विंडीजची अवस्था २ बाद ७ अशी केल्यावर मिसबाहने वेस्ट इंडिजचा ‘स्फोटक फलंदाज’ ख्रिस गेल (१) याला धावचीत करून विंडीजला ३ बाद ७ असे आणखी ‘अडचणीत’ आणले. त्यानंतर सामन्यावर वर्चस्व गाजविले ते आफ्रिदीने. पुढील सर्वच्या सर्व बळी आफ्रिदीने मिळवून वेस्ट इंडिजला एकहाती ९८ धावांत गुंडाळण्याची किमया साधली. पाकिस्तानच्या डावात ७६ धावांची ‘स्फोटक खेळी’ करणार्याव आफ्रिदीने गोलंदाजीत ९ षटकांत ३ षटके निर्धाव टाकीत १२ धावांत ७ बळी घेण्याची करामत केली.