पुणे, दि. 15 – राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमधील सुमारे 45 हजारांहून अधिक रिक्त राहिलेल्या जागांसाठी 16 जुलैपासून औरंगाबाद येथील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाची शेवटची फे री होणार आहे. सीईटीतील गुणांच्या आधारे हे राज्यस्तरीय प्रवेश होतील, अशी माहिती पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक पी. व्ही. सरोदे यांनी दिली. यंदाच्या वर्षी इंजिनिअरिंग अभ्यासक्रम प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. राज्यातील बहुतांश विद्यापीठांमधील इंजिअनिरिंग कॉलेजमध्ये निम्म्याहून अधिक जागा र्नित आहेत. त्यामुळे या र्नित जागांवर प्रवेशासाठी औरंगाबादच्या शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपलब्ध कॉलेजमधील र्नित जागेवर प्रवेशाचा पर्याय देण्यात येईल. विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यास त्याचा प्रवेश तिथेच निश्चित केला जाईल.
सीईटीत ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले, पण पहिल्या व दुसर्या फे रीत प्रवेश निश्चित केला नाही, त्यांना येथून नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची श्नयता आहे. या मेरीत राज्यातील सर्वोत्तम कॉलेजमधील र्नित जागांवर प्रवेश मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांमध्ये चुरस राहणार आहे. त्यातही पुणे, मुंबई, नाशिक येथील कॉलेजना प्रथम पसंती अधिक राहील. त्यामुळे कौन्सिलिंगमध्ये किमान 15 ते 20 हजारांहून अधिक जागा भरण्यात येतील, अशी श्नयता आहे. तसेच कौन्सिलिंगमध्ये सीईटीत ज्या विद्यार्थ्यांना 200 पैकी 194 ते 20 या दरम्यान गुण मिळाले आहेत, त्यांनाच प्रवेशाची संधी देण्यात येईल.
प्रवेश प्रक्रिया पुढीलप्रमाणे (गुण)
सकाळी नऊ वाजता दुपारी तीन वाजता
16 जुलै 194 ते 140 139 ते 115
17 जुलै 114 ते 102 101 ते 92
18 जुलै 91 ते 85 84 ते 80
20 जुलै 79 ते 76 75 ते 72
21 जुलै 71 ते 69 68 ते 66
22 जुलै 65 ते 63 62 ते 60
23 जुलै 59 ते 57 56 ते 54
24 जुलै 53 ते 50 49 ते 20