
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनची लोकप्रिय ऐतिहासिक मालिका भारत का वीर पुत्र – महाराणा प्रतापमध्ये लवकरच एक नवीन वळण येणार आहे, जे दर्शकांना थक्क करेल. शाम्स खानच्या विरुद्ध राणा उदय सिंगच्या विजयानंतर मेवाडमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच हा विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. महाराणी जयवंता बाई पूर्ण रिती-रिवाजासह राणा उदय सिंग व प्रताप यांचे स्वागत करते. राजमहलला उत्तमप्रकारे सजविण्यात आले आहे. तसेच सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. संपूर्ण मेवाड आनंदामध्ये दंग आहे आणि प्रतापची प्रशंसा करत आहे.धामधूम व उल्हासामध्ये राणी भटियानीचे आगमन होते आणि ती प्रतापला ओरडते. कारण तिला प्रतापचे इतक्या लहान वयामध्ये जीव धोक्यात घालणे आवडत नाही.
