त्रिनिनाद : तिरंगी मलिकेच्या फायनलमध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एरंगाच्या चेंडूवर षटकार मारला आणि टीम इंडियाने श्रीलंकेवर एक गडी आणि दोन चेंडू विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या या रोमहषर्क लढतीत टीम इंडियाला विजयासाठी १५ धावांची गरज होती. कर्णधार धोनीने मॅच फिनिशर या नावाला साजेशी खेळी करत जेतेपद मिळवून दिले. त्याने लंकेच्या एरंगाच्या अखेरच्या षटकात दोन षटकार आणि एक चौकार फटकावत विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकल्यानतर टीम इंडियाने श्रीलंकेला फलंदाजीसाठी पाचारण केले. भुवनेश्वर कुमारने श्रीलंकेची सलामीची जोडी फोडली. मात्र त्यानंतर संगकारा आणि थिरिमन्नेने टीम इंडियाच्या गोलंदाजीवर हल्लाबोल चढवला. या दोघांनी तिस-या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी रचली.त्यात संगकाराच्या ७१ तर, थिरिमन्नेने ४६ धवा केल्याज होत्याल. त्यांनतर मात्र अश्विनन आणि ईशांतने ही जोडी फोडल्यानंतर श्रीलंकेच्या तळच्या फलंदाजांनी मग जाडेजासमोर अक्षरश नांगी टाकली. जाडेजाने सर्वाधिक चार बळी तर भुवनेश्वर, ईशांत आणि अश्विनने प्रत्येकी दोन-दोन बळी घेतले.
लंकेच्या २०१ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात काहीशी अडखळती झाली खरी पण त्यानंतर रोहित शर्माने आणि मग कर्णधार धोनीने श्रीलंकेच्या गोलंदाजाना चोपले. श्रीलंकन मा-यासमोर शिखर धवन, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, आणि रवींद्र जाडेजासारख्या फलंदाज झाटपट बाद झाले.
दुसरीकडे रोहितने ५८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याने ८९ चेंडूत ५ चौकार आणि एक षटकार लगावात आपलं अर्धशतक साजरे केले. रोहितनंतर टीम इंडियाची सूत्रे कर्णधार धोनीने आपल्या हाती घेतली होती. पण धोनीलाही तळाच्या फलंदाजांकडून हवी तशी साथ मिळत नव्हती. अखेर धोनीने ईशांत शर्माला हाताशी घेत दहाव्या विकेटसाठी नाबाद २१ धावांची भागीदारी रचली. त्यात ईशांतच्या नाबाद २ तर धोनीने पाच चौकार व दोन षटकारांसह नाबाद ४५ धावांचा मोलाचा वाटा उचलला. धोनीन कर्णधार धोनीलाच सामन्यातल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला.