
नवी दिल्ली- दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता ही सुनावणी 25 जुलै रोजी होणार असल्याचे आज (गुरुवार) बाल न्याय मंडळाने सांगितले आहे. दिल्लीत 16 डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर या घटनेचे पडसाद संपुर्ण देशभरात उमटले होते. बालगुन्हेगारी कायद्याअंतर्गत या अल्पवयीन मुलावर सुनावणी होणार आहे. जर या खटल्यात आरोपीवरील गुन्हा सिध्द झाल्यानंतर त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.
