जग्वार लँड रोव्हरची एफ टाईप स्पोर्टस कार सादर

मुंबई दि.९ – टाटा मोटर्सने खरेदी केलेल्या जग्वार लँड रोव्हरची एफ टाईप स्पोर्टस कार मुंबईत सादर करण्यात आली आहे. तिची मुंबईतील किंमत आहे १ कोटी ६१ लाख रूपये. भारतातच या गाड्या असेंबल करण्याचाही कंपनीचा विचार आहे.

जग्वार एफ टाईप दोन प्रकारात सादर करण्यात आली आहे. ५००० सीसी पेट्रोल इंजिनची व्हीएस ८ ची किमत १ कोटी ६१ लाख रूपये आहे तर ३००० सीसी पेट्रोल इंजिन एफ टाईप १ कोटी ३७ लाख रूपयांना आहे. जग्वार लँड रोव्हर इंडियाचे उपाध्यक्ष रोहुत सुरी या संबंधी बोलताना म्हणाले की जग्वार साठी हा महत्त्वाचा टप्पा आहे. भारतात या ब्रँडबाबतचे आकर्षण वाढण्यास हातभार लागणार आहे. भारतात स्पोर्टस कारचे मार्केट अजून बाल्यावस्थेत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने या गाड्यांची विक्री व्हावी ही अपेक्षा नाही. मात्र त्यामुळे याच कंपनीच्या अन्य मॉडेल्सची विक्री वाढण्यास मदत मिळावी अशी अपेक्षा आहे.