जमैका: वेस्ट इंडिज येथे सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत टीम इंडियाची लढत आज श्रीलंकेशी होत आहे. दोन्ही संघांसाठी आजचा हा सामना म्हणजे ‘करो या मरो’ची लढाई आहे. या सामन्यालत टीम इंडियाने लंकेला मोठया फरकाने पराभूत केले तरच या तिरंगी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचता येणार आहे.
सोमवारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजवर ३९ धावांनी विजय मिळवला आहे. श्रीलंकेचा हा दुसरा विजय आहे. त्यामुळे भारतासमोरील अडचणी वाढल्या आहेत. फायनल गाठण्यासाठी टीम इंडियाला श्रीलंकेला मोठ्या फरकाने लोळवावे लागणार आहे. आतापर्यंत या स्पणर्धेत टीम इंडियाला फक्त एकाच विजयाची नोंद केली आहे.
काल झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या विजयामुळे श्रीलंका गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचली आहे. तर भारत अजूनही तळाला आहे. त्यामुळे आजची लढत टीम इंडियासाठी सेमीफायनलच असणार आहे. या सामन्यात भारताला विजय मिळवावा लागणार आहे. मागील सामन्यात टीम इंडीया व लंकेने विंडीजला पराभूत केले असल्याने दोन्ही संघाचे मनोबल उंचावले आहे.