लखनौ- गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमधील महापुरातून गुजरातमधील पंधरा हजार नागरिकांना वाचविल्याचे नरेंद्र मोदी सांगत आहेत. त्याममुळे त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप केले जात आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे संकुचित मानसिकता असलेले नेते आहेत. त्यामुळे कधीच ते पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार ठरू शकत नाहीत, असे उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी म्हणत त्यांच्यावर तोफ डागली आहे.
उत्तराखंडमधील महापुरातून गुजरातमधील पंधरा हजार नागरिकांना वाचविल्याचे मोदी सांगत असल्याखवरून आता चांगल्याच वादाला तोंड फुटले आहे. यावर बोलताना मायावती म्हणाल्या, ‘भाजपमधील नेते मोदी हे आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे सगळीकडे सांगत आहेत. तर, दुसरीकडे मोदी फक्त गुजरातपुरता विचार करून तेथील नागरिकांना वाचविल्याचा डंका पिटत आहेत. त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करतो. त्यांची मानसिकता संकुचित असून, ते कधीच देशाचे सर्वोच्च पद निभावू शकत नाहीत. ‘
प्रलंयकारी आलेल्याव पूरांनतर उत्तराखंडमधील आडकून पडलेल्या नागरिकांसाठी करण्यात आलेल्या बचावकार्यातही काही पक्षांनी राजकारण आणले आहे. असा प्रकार करणे मला योगय वाटत नाही. राजकारण करायच्याक ठिकाणी करावे प्रत्येक ठिकाणी राजकारण करून नये ही अत्यंत चुकीची बाब असल्याचे यावेळी मायावती यांनी स्पष्ट केले.