वनश्री, वृक्षमित्र पुरस्कारांच्या रकमेत वाढ

पुणे, दि. 7 (प्रतिनिधी)-पर्यावरणाचे संरक्षण करणारे वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या क्षेत्रात चांगली कामगिरी करणा-या संस्थाना ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ देवून गौरविण्यात येते. वनेत्तर जमिनीवर वृक्षसंवर्धनास अधिक व्यापक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासन ाने वनश्री पुरस्कार आणि वृक्षमित्र पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ही रक्कम पन्नास हजार चाळीस हजार व तीस हजार रुपये अशी करण्यात येणार आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार ’ विभागीयस्तर आणि राज्यस्तर अशा दोन स्तरांवर देण्यात येतो. ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था, ग्राम विभाग किंवा जिल्हा या वेगवेगळ्या संवर्गात पुरस्कार देण्यात येतात. राज्यस्तरावर पाच संवर्गामध्ये तीन पुरस्कार तर, विभागस्तरावर पाच संवर्गामस्ध्ये दोन पुरस्कार देण्यात येतात. राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 40 हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार 30 हजार रुपये तर, विभागस्तरावर प्रथम पुरस्कार 25 हजार रुपये, द्वितीय पुरस्कार 15 हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

याचबरोबर वृक्ष लागवडीच्या कामात खासगी संस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी तीन खासगी संस्थांना मानचिन्ह आणि 25 हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वृक्ष लागवडीच्या पुरक योजनांमार्’त राज्यातील 33 टक्के क्षेत्र वनाखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. याकरिता सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून शासन व लोकसहभागातून वृक्षलागवडीचे काम पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग वाढविण्यासाठी पुरस्कारांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.