औरंगाबाद – मुलींचा आंतर जातीय विवाह केल्याने वाळीत टाकल्याप्रकरणी जातपंचायत समितीचे दिलीप शिंदे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपआयुक्त अरविंद चावरिया यांनी दिली. या प्रकरणी तक्रार भटके जोशी समाजातील गरड यांनी तक्रार केली आहे.
जात पंचायतीविरूध्द औरंगाबादेत गुन्हा दाखल
नाशिक येथे अशाच एका प्रकरणात अटक असलेल्या पंचांनीच आपला छळ केला आहे , असा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. जाधववाडी येथील दगडू गरड यांनी ही माहिती दिली. मोठ्या मुलीचा विवाह लातूर येथील नात्यातील तरुणांशी २५ एप्रिल २००८ रोजी झालेला आहे हे लग्न जातीबाह्य तरुणाशी झाले आहे , असा ठपका जातपंचायतीने ठेवला व आपल्याला वाळीत टाकले आहे. ५१ हजार रुपये दंड भरल्यास जातीत परत घेण्यात येईल, असा निर्णयही पंचांनी घेतला होतो. दोन टप्प्यात मिळून २१ हजार भरले, परंतु उर्वरित पैसे देता न आल्याने पंचायतीने जाती बाहेर काढण्याचा निर्णय कायम ठेवला.
नाशिक येथे जात पंचायतीची महिन्यातून एकदा बैठक घेते, मात्र त्यात हितकारक काम न करता अशाच प्रकारे खंडणी वसुली करण्याचे काम केले जाते. त्यांच्या दहशतीपोटी कुणीही बोलू शकत नसे, असा आरोप गरड यांनी केला आहे. अशाच एका प्रकरणात पंचायतीच्या काही सदस्यांना नाशिक येथे नुकतीच अटक झाली आहे, त्यामुळे छळाबाबत बोलण्याची हिंमत झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
