आळंदी पोलिसांची युक्ती कल्पनेपेक्षा अधिक यशस्वी

पुणे दि. ४ – लोहा लोहेको काटता है अशी हिैंदीत एक म्हण आहे. या म्हणीचा उपयोग आळंदी पोलिसांनी अतिशय कुशलतेने करून घेतला आहे. दरवर्षी आळंदीत लाखोंच्या संख्येने पंढरपूर वारीसाठी जमणारया वारकरयाना त्यामुळे चोरी दरेाड्याचे भय राहिलेले नाही. याचा पुरावा म्हणजे गेल्या दोन वर्षात वारकर्यांीना लुटल्याची अथवा साखळी चोरयाची एकही घटना घडलेली नाही.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार आळंदीत दरवर्षी वारीसाठी वारकरी आले की दोन दिवसांच्या मुक्कामात लुटल्याच्या अथवा साखळी चोरीच्या किमान १० ते १५ घटना घडायच्याच. मात्र गेली दोन वर्षे पोलिसांनी आगळीच युक्ती लढविली आहे. त्यांनी माजी गुन्हेगारांनाशी संधान बांधून आसपासच्या जिल्ह्यातून येणारया चोरट्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली आणि ती कमालीची यशस्वी ठरली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वारी सोहळ्यात गेली दोन वर्षे आता वारकरी झालेले हे माजी गुन्हेगार कुठेही संशयित चोर दिसला की त्याची खबर त्वरीत पोलिसांना देतात. या लोकांनी गुन्हेगारीपासून फारकत घेतली असून ते मनापासून पोलिसांना सहाय्य करतात. पोलिसही त्याची जाण ठेवून त्यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांना कांही पैसे देतात व वारीदरम्यान त्यांची जेवण व निवासाची व्यवस्था करतात.

पाच माजी गुन्हेगारांवर ही कामगिरी यंदाही सोपविण्यात आली होती आणि त्यांनी ती चोख पार पाडल्याने गतवर्षीप्रमाणेच यंदाही वारकरी चोरट्यांपासून सुरक्षित राहिलेच पण आळंदीत आपण सुरक्षित आहोत ही त्यांची खात्रीही पटली असे पोलिसांचे म्हणणे आहे.