
पाकिस्तानी कलाकारांना भारतात कितीही विरोध होत असला, तरी पाकिस्तानी कलाकारांचं भारतात येणं थांबत नाही. पाकिस्तानातून आलेल्या अनेक अभिनेत्रींनी भारतात आपला जम बसवला. सलमा आगापासून ते साशा आगापर्यंत पाकिस्तानी अभिनेत्रींची भारतीय सिनेमांमध्ये परंपरा निर्माण झाली. वीना मलिकने अश्लील फोटो आणि आक्षेपार्ह चाळ्यांनी बॉलिवूड चांगलंच गाजवलं. साशा आगाच्याही ऑरंगजेबमधील न्यूड सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली. आता आणखी एक पाकिस्तानी अभिनेत्री त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतात दाखल होत आहे. फिल्म `बोल`मधून प्रसिद्ध झालेली पाकिस्तानी अभिनेत्री हुमैमा मलिक आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या आधी दोनदा प्रयत्न करूनही तिला भारतीय सिनेमात काम करायला मिळत नव्हतं. मात्र आता कुणाल देशमुखच्या एका सिनेमात हुमैमाला संधी मिळाली आहे.
