कमी चार्जिंग करून वाढवा मोबाईल बॅटरीचे लाईफ

लंडन दि.३- मोबाईल जगातील सर्वसामान्यांपासून असामान्यापर्यंत सर्वांचीच अत्यावश्यक गरज बनली आहे. बॅटरी डिसचार्ज झाल्यामुळे मोबाईल बंद पडणे ही नित्याची घटना असली तरी बॅटरी बदलणे हे मोठा खर्चाचा भाग असतो. यामुळे आपल्या हँडसेटची बॅटरी दीर्घकाळ कशी चालेल यासाठी एक अगदी सोपी गोष्ट एरिक लाइमर या तंज्ञानाने शोधून काढली आहे.

एरिकचा असा दावा आहे की मोबाईलची बॅटरी पूर्ण चार्ज केली तर ती लवकर खराब होते. त्यामुळे युजरनी मोबाईल पूर्ण चार्ज करणे टाळावे. अधिक चार्जिंग झाल्यास बॅटरी बिघडण्याचे प्रमाण वाढते तसेच मोबाईल पूर्ण डिसचार्ज झाल्यावर बॅटरी फुल चार्ज करण्यानेतही बॅटरीचे आयुष्य घटते. बॅटरी प्रत्येकवेळी ५० टक्केच चार्ज केली तर मात्र ती दीर्घकाळ टिकते.

मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तो गरम होतो. त्या उष्णतेचा परिणाम बॅटरीवर होत असतो आणि ती लवकर खराब होते. यामुळे मोबाईल कमी वेळ चार्ज करणे व बॅटरीही कमी चार्ज करणे केव्हाही योग्य ठरते असे एरिकचे म्हणणे आहे.