
वॉशिंग्टन, दि.28 – गेल्या सात वर्षापासून मुंबई दहशतवादी हल्ल्याचा खटला पाकिस्तानात रेंगाळत आहे. या खटल्यातील सात आरोपींना शिक्षा देणे जमत नसल्यास पाकिस्तानने त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे सुपूर्द करावे, अशा शब्दात अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले. अमेरिकन-भारत सार्वजनिक व्यवहार समितीतर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी अमेरिकन संसदेच्या परदेशी व्यवहार समितीचे अध्यक्ष एड राइस यांनी ही मागणी केली.
