मनसेबाबत चर्चा थांबवा : राज ठाकरे

नाशिक, दि.24 – महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये येणार की नाही,याविषयीची चर्चा मी थांबवायला सांगितली आहे. एवढं होऊनही या चर्चाथांबणार नसतील, तर संबंधित पक्षाच्या नेत्यांची माझ्याशी जी चर्चा झालेयती उघड करावी लागेल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजभाजपनेत्यांना, त्यांचं नाव न घेता दिला.मनसेमध्ये सगळे निर्णय मी घेतो. आम्ही काय करायचं, याच्याशी अन्यकुणाचाही संबंध नाही. त्यामुळे मनसेच्यावतीनं कुणी बोलायला जाऊ नये आणिइतर पक्षांनीही या फंदात पडू नये, असं त्यांनी बजावलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारपासून नाशिकच्या दौर्‍यावर आहेत. आज दुपारीते पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासासाठी मनसेकटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय.  नाशिक पालिकेच्या संथ कारभारावरविरोधकांकडून सातत्याने होणार्‍या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आजमहापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली. तसंच नगरसेवकांची भेट घेऊन त्यांची झाडाझडतीही घेतली. नागरिकांची कामंवेळच्यावेळी होण्यासाठी कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावल्याचं राज ठाकरेयांनी यावेळी म्हटलंय. पण, ज्याप्रमाणे जनतेच्या मनसेकडून अपेक्षा आहेतत्याचप्रमाणे मनसेच्याही जनतेकडून काही अपेक्षा आहेतफ असं राज ठाकरेयांनी यावेळी म्हटलंय.

नाशिक महापालिकेनं शहरात अवैध बांधकामं पाडण्याचा सपाटा लावलाय. त्यावरआयुक्तांना आदेश देताना अतिक्रमण तोडताना मनसेचे नेतेही समोर आले तरीथांबू नकाफ असा सल्ला राज ठाकरे यांनी दिलाय.दरम्यान, हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप निराधार आहेत असंही त्यांनीम्हटलंय. हेमंत गोडसे यांनी नुकताच मनसेमधून शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकारींवर आरोप केले होते