शिर्डीच्या साईबाबांना मुघल कालीन नाण्यांचा हार

शिर्डी दि.२२ – नवी दिल्ली येथील व्यावसायिक सतीश लोहिया यांनी येथील साईबाबांच्या मूर्तीसाडी मुघल कालीन नाणी असलेला हार अर्पण केला असून ही सर्व नाणी अस्सल सोन्याची आहेत. हारामध्ये अशी ५१ नाणी आहेत आणि ती दुर्मिळ समजली जातात. या हाराची किंमत १६ लाख २८ हजार रूपये असल्याचे समजते.

शिर्डी संस्थान ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी किशोर मोरे म्हणाले की २०१३ सालाची सुरवात झाल्यापासून सहा महिन्यात साईबाबांना सोने स्वरूपात देणगी मिळण्याची ही चौथी वेळ आहे. लोहिया यांनी दिलेला हा हार शुक्रवारच्या आरतीच्या वेळी बाबांना घातला जाईल असेही ते म्हणाले.