कोल्हापूरातील सिरीयल किलर पोलिसांच्या जाळ्यात?

कोल्हापूर, दि.20 (प्रतिनिधी) – कोल्हापूर हे शहर गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच घटनांमुळे चांगलेच प्रसिद्धीस आले. एकामागून एक खूनांच्या दहा घटना घडत गेल्याने पोलीस यंत्रणाही हतबल झाली होती. संपूर्ण शहराला हादरवून टाकणार्‍या सिरियल किलरला जेरबंद करण्यात अखेर लक्ष्मीपुरी पोलिसांच्या मदतीने शाहूपुरी पोलिसांना यश आले आहे. शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा गस्त घालत असताना गोकुळ हॉटेल परिसरातून त्या सिरीयल किलरला ताब्यात घेतले आहे. दिलीप कुंवरसिंह लहरीया (वय 23,रा. पथारिया , पोस्ट- जरेली ,ता- बिलासपूर, जि.-दुर्ग , राज्य- छत्तीसगड) असे या तरुणाचे आहे. दिलीपने 13 जूनला स्टेशन रोडवर आणि 15 जून ला केदार क्लासेस जवळील असे 2 खून केले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीला येतात काय? याची पोलिस कसून चौकशी करत आहेत.

दिलीप कुंवरसिंह लहरीया याने भूक शमवण्यासाठी सामोसा खाण्यावरून आणि कौठूम्बिक वैफल्यग्रस्त होऊन हा प्रकार केला आसल्याच विशेष पोलीस महानिरिक्षक तुकाराम चव्हाण आणि जिल्हा पोलीस अधिक्षक विजयसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं . दिलीप हा पूर्वी काही दिवस नागपूर आणि
पुण्यात राहत होता . तो ही फिरस्त तरुण आहे . पुण्यात काही दिवसापूर्वी त्याची मुलगी आणि पत्नी सोडून गेल्यामुळे तो वैफल्य ग्रस्त झाला असावा असा पोलिसांनि प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे .शहरात नेहमी प्रमाणे गस्त घालण्यात येणार असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये अस आवाहन ही पोलिसांनी केला आहे .

दरम्यान, कोल्हापुरात सुरू असलेल्या सिरियल किलरफ खूनसत्राचा तपास करण्यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई पोलिसांचे खास पथक कोल्हापूरला बोलावले आहे. या खास पथकात मुंबई पोलिसांचे 6 तज्ज्ञ अधिकारी असून, यापूर्वी या अधिकार्‍यांनी मुंबईतील अशा प्रकारचे सिरियल किलर प्रकरण हाताळले आहे. हे अधिकारी कोल्हापूर पोलिसांना मार्गदर्शन करणार आहेत. हे खास पथक आज दुपारपर्यंत कोल्हापुरात दाखल होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.