
पुणे,दि.2१-उत्तराखंड राज्यातील झालेली ढगफुटी हा हवामानाचा एक प्रकार आहे, यावर्षी वेगाने मोसमी पाउस पुढे सरकणे व ढगफुटी होणे ही अनेक ठिकाणी झालेली बाब आहे. मोसमी पावसाच्या ढगांचे थर जेथे पर्वतराजीला थडकणार आहेत, त्या स्थितीचा अंदाज घेवून जनतेला सावधगिरीचा इशारा देण्याची गरज आहे, असे गेली दहा वर्षे ज्यांनी देशातील अनेक ठिकाणचे मोसमी पावसाचे अचूक अंदाज दिले त्या डॉ रामचंद्र साबळे यांनी बोलून दाखविले आहे. ते म्हणाले, बिहारमध्ये मला तशी शक्यता वाटते पण अजूनही अनेक ठिकाणी पर्वतराजीला थडकणार्या मोसमी ढगांची शक्यता आहे ,त्याचा वेध घेण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, जूनच्या पहिल्याच आठवड्यात पा ऊस सुरु झाला की, एक महत्वाची गोष्ट घडते ती म्हणजे सारी पिके व्यवस्थित येतात . यावर्षी ती स्थिती आहे पण यावर्षी गंभीर स्थिती अशी आहे की, दक्षिणेकडून उत्तरेकडे अतिवेगाने हवेचे दाब सरकू लागले आहेत यापूर्वी अशी स्थिती झाल्याचे फारशी माहिती उपलब्ध नाही, त्यामुळे हवामान याचा सामना गांभिर्याने करायला हवा.
या वर्षीच्या पावसाचे वैशिष्ठ्य सांगताना ते म्हणाले, आन्दमान मधून निघालेला मोसमी पाऊस यावेळी वेळे आधी आला येवढेच त्याचे वैशिष्ठ्य नसून त्याने वेगाने अंतर कापले व आला तसा तो जोराचा पाउस घेवूनच आला आहे. पाऊस केरळला पोहोचला असा बातम्या येईपर्यंत तो महाराष्ट्रात सुरु झाला होता. त्याचवेळी लक्षात येत होते की, यावर्षीचा पाउस ठिकठिकाणी ढगफुटीचा आहे. महाराष्ट्रात तशी ढगफुटी होत होती. अगदी जेथे दुष्काळी स्थिती होती त्या ठिकाणी पाचशे मिलीपेक्षा अधिक पाउस पडल्याची उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात आपल्याला पाउस आल्याचे लक्षात यायच्या आत पावसाने उत्तर प्रदेश, दिल्ली गाठली होती. त्याच वेळी कर्नाटकापासून ते हिमालयापयर्ंत जोराच्या वार्याबरोबर ढगाचा कॉलम पुढे सरकत होता. हवेच्या दाबात फरक झाला की, दक्षिणेतील ढगांना जोराची उत्तरेची गती मिळते. त्यात ढगावर ढग अशी स्थिती होवून ढगफुटीची स्थिती येते. ती स्थिती कर्नाटक ते उत्तराखंड या दरम्यान आली होती. तीच एक सिस्टीम सध्या बंगालच्या उपसागरापासून ते बिहारपयर्र्त तयार होताना दिसते आहे. तेथेही कोठे कोठे ढगफुटी सुरु झाली आहे. हा पाउस बिहारच्या टोकाला हिमालयापयर्र्त पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे तेथे आताच काही काळजी घेण्याची गरज आहे.
यावर्षी टोकाचा दुष्काळ व मोसमी पावसाचा काळ आल्यानंतर जोराची मुसंडी असा प्रकार घडला आहे. पण ही स्थिती फक्त भारतात नाही तर जगात अनेक देशात आहे, असे सांगताना ते म्हणाले, गेल्याच आठवड्यात अफगाणिस्थानमध्ये टोकाचा दुष्काळ व टोकाची ढगफुटी झाली आहे. शीत कटिबंधात ही स्थिती निराळी असते पण युरोपातील प्रत्येक देश व चीन येथेही दुष्काळ जोराची पावसाची मुसंडी असे प्रकार घडले आहेत. युरोपमध्ये मोठ्या पुराचे प‘संग कमी येतात पण यावर्षी बहुतेक ठिकाणी स्थिती तशी आहे. याचे कारण माझ्या दृष्टीने हवामानातील बदल हे आहे. कमाल तपमान वाढते आहे त्याही पेक्षा किमान तपमान वाढते आहे. यावर्षी देशभर विक‘मी कमाल तपमान होते. असेच विक‘मी तपमान हिंदीमहासागरात होते त्यामुळे मोसमी पाउस लवकर येणे व तो आता वेगाने वर सरकणे यात त्यांचे रुपांतर होत आहे याचा नव्याने अभ्यास होण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.
