मुंबई: उत्तराखंडमध्ये गेलेले महाराष्ट्रातील सुमारे ३३४ यात्रेकरु बेपत्ता असल्याची माहिती, राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. या सर्व भाविकांचा शोध सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या लोकांशी अद्याप संपर्क न झाल्याने कुटुंबियांची चिंता वाढली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील १ हजार ६३८ नागरिक सुखरुप असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ३३४ यात्रेकरु बेपत्ता
राज्यातील आणखी काही भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. त्यांच्यापैकी काहींशी संपर्क झाला आहे, मात्र अजूनही मदत पोहोचलेली नाही. ३४९ पैकी १३६ नागरिकांचा संपर्क झाला आहे. यामध्ये औरंगाबादमधील १०५ नागरिक आहेत. हे सर्व केदारनाथच्या डोंगरावर अडकले आहेत. त्यापैकी ४९ लोकांशी संपर्क झाला आहे.
२५-३० यात्रेकरुन महाराष्ट्र सदन बद्रिनाथ येथे अडकले आहेत. डोंबिवलीतील १०५ जणांचा ग्रुप बद्रीनाथमध्ये अडकला आहे,मात्र अजूनही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही. ९२ पैकी पाच जनाशी संपर्क झाला आहे.
