मुंबई : ‘एनडीए’त पडलेल्या फूटीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनाथसिंह यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आगामी काळात ‘एनडीए’त फुट पडू नये यासाठी चर्चा केली असल्याचे समजते. या वेळी तिच्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
राजनाथसिंहंनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
‘एनडीए’त पडलेल्या फूटीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांना प्रचार प्रमुख केल्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर, शिवसेनेनेही नाराजी व्यक्त केली होती. लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्याची भाजपला गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
एनडीए आणि जेडीयूची युती तुटणे हे ही दुर्देवी असल्याचे यापूर्वी शिवसेना नेत्यांनी म्हटलं होते. शिवसेना आणि भाजपची मैत्री ही चिरंतन असल्याचा दावा दोन्ही पक्षातील नेते करतात. ही पुरातन मैत्री आणखी टिकावी, आपआपसातील समज गैरसमज समजून घेण्यासही राजनाथ सिंह यांना मदत होणार आहे.
