सन्नी लियोन करणार एक्शन सिनेमे

पोर्न स्टार आणि बॉलीवुड अभिनेत्री सन्नी लियोन आता आगामी काळात येत असलेल्या सिनेमातून एक्शन करताना दिसणार आहे. सन्नी लियोनने काही दिवसापूर्वीच पराग सांघवीच्या तीन सिनेमाची डील साइन केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन देवांग ढ़ोलकिया करीत आहे. ‘जिस्म-२’ या सिनेमाच्या शूटिंग नंतर देवांगने सन्नी भेट घेऊन सिनेमाची कहाणी ऐकवली होती. या तीन सिनेमापैकी ‘टीना एंड लोलो’ या सिनेमाची कहाणी सन्नीला खुप आवडली आहे. या सिनेमातून आता सन्नीला नव्या रोल मध्ये पहावयास मिळणार आहे.

या बाबत अधिक बोलताना देवांग ढ़ोलकिया म्हणाला, ‘ आगामी काळात येत असलेल्या ‘टीना एंड लोलो’ या सिनेमात सन्नी एक महत्वपूर्ण भूमिका करताना दिसणार आहे. हा सिनेमा एक्शन, ड्रामा आणि भावना यातून परिपूर्ण आहे. येत्या काळात सन्नी सीनइंडस्ट्रीत वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. हा तिचा नवा लूक सन्नीची इमेज बदलणार आहे.’

या सिनेमाची शुटींग ऑगस्ट मध्ये सुरु होणार आहे. या सिनामात अभिनेत्री म्हणून मिनिषा लांबाची देखील निवड होण्याची शक्यता आहे. सन्नीने तिच्या कैरियरची सुरूवात पूजा भट्टच्या ‘जिस्म-२’ या सिनेमातून केली आहे. सन्नीच्या आगामी काळात येत असलेल्या एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस -२ ’ मध्ये प्रमुख भुमिका करीत आहे.