झपाटलेला – 2 ने गाठला दोन कोटीचा टप्पा

मराठी रुपेरी पडद्यावर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या तात्या विंचू या खलनायकाचा थ्रीडी अवतार पहायला प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील 25 जिल्हयात प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून एक आठवडयानंतरही हा ओघ तसाच कायम आहे. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्हयांमध्ये महेश कोठारे यांच्या झपाटलेला 2 या थ्रीडीपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

7 जूनला राज्यातील 150 चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेला झपाटलेला 2 पहिल्या आठवडया अखेरीस 245 चित्रपटगृहांतील 612 शोज् मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. चित्रपटाने पहिल्याच आठवडयात 2.47 कोटीची दमदार खेळी केली असून 14 जूनपासून झपाटलेला 2 हैदराबाद व बेळगाव शहरांत देखील प्रदर्शित झाला आहे. 21 जूनपासून इंदोर आणि गोव्यातील प्रेक्षकांना या थ्रीडी पटाचा आस्वाद घेता येणार आहे. झपाटलेला 2 ला मिळालेल्या जबरदस्त ओपनिंगमुळे खूप आनंद झाल्याची आणि आज सातव्या आसमानावरय असल्याची भावना निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांनी व्यक्त केली आणि या सोबतच झपाटलेला 3 आणि पछाडलेला 2 या दोन आगामी चित्रपटांची जोरदार घोषणा केली.