जुलैत नोकियाचा नवीन फ्लॅगशीप कॅमेरा फोन

फिनिश मोबाईल फोन मेकर नोकियाने त्यांचा नवीन फ्लॅगशीप कॅमेरा फोन ११ जुलै ला सादर केला जाणार असल्याचे जाहीर केले असून त्यासंबंधीच्या वार्ता इंटरनेटवर प्रसारित झाल्या आहेत.

या नुसार हा नवीन फोन फोटोग्राफिक सेन्सर कॅमेर्याससह येणार असून त्याचा कॅमेरा तब्बल ४१ मेगापिक्सल क्षमतेचा आहे असे समजते. गेल्या कांही महिन्यांत कंपनीने विक्री वाढीसाठी विविध किमतींच्या रेंजमधील स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. मात्र तरीही पहिल्या तिमाहीत कंपनीच्या लोअर एन्ड हँडसेट विक्रीत घटच दिसून आली आहे. ही घट भरून काढण्यासाठी आणि बाजारातील आपले स्थान पुन्हा मिळविण्यासाठी जुलैद सादर केले जाणारे मॉडेल उपयुक्त ठरेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.